भगवान महावीर स्वामी 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाच्या पुणे जिल्हास्तरीय समितीवर सदस्य पदी विनोद सोळंकी

0

पुणे : भगवान महावीर स्वामी 2550 व्या निर्वाण कल्याण महोत्सव पुणे जिल्हास्तरीय समितीवर विनोद सोळंकी यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती भगवान महावीर स्वामी 2550 व्या निर्वाण कल्याण महोत्सव समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे,
24 वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याण महोत्सवानिमित्त या समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, यांच्या आयोजनासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
विनोद सोळंकी हे गेली 30 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा योगदान असतो, त्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!