हेडावे उपसरपंच पदी प्रा. कैलास बागुल…
अमळनेर : तालुक्यातील हेडावे ग्रामपंचायतीत गुरुवारी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रा. कैलास पुंडलिक बागुल यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच गुलाब धोंडू पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी ही निवड करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच मनिषा भास्कर पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर निवडणूक अधिकारी म्हणुन ग्रामविकास अधिकारी गुरुदास गंगाराम भोई यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी प्रा. कैलास बागुल यांचाच एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य गुलाब पाटील, सुनिता ढिवरे, युरोपा पाटील, अनिता पाटील आदी उपस्थित होते. बिनविरोध उपसरपंच निवड झाल्याबद्दल बागुल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.