जातीयवादी छोटू जैन खाशीत कशाला…

0

असा व्यक्ती शैक्षणिक संस्थेत असेल तर विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडेल ?

 

अमळनेर : सामाजिक समतेचा वारसा जपणाऱ्या अमळनेर शहरात सध्या एका गंभीर विषयामुळे चर्चा रंगली आहे. स्थानिक बिल्डर छोटू जैनने घर विक्रीच्या व्यवहारात जातीय भेदभाव केला आहे. विशेष म्हणजे सदर बिल्डर खान्देश शिक्षण मंडळ येथे व्हाईस चेअरमन पदावर कार्यरत असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

घर खरेदीसाठी संपर्क साधल्यानंतर सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला; मात्र नंतर जात विचारल्यावर संपर्क बंद करण्यात आला व घर देण्यास नकार देण्यात आला आहे. या घटनेमुळे सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, शिक्षण संस्थेतील पदाधिकारी म्हणून अशा प्रतिमेच्या व्यक्तीची भूमिका योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षण संस्था या समाजात समता, बंधुता आणि संविधानिक मूल्ये रुजविण्याचे केंद्र मानल्या जातात. विद्यार्थ्यांवर पदाधिकाऱ्यांच्या विचारसरणीचा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. त्यामुळे जर एखाद्या पदाधिकाऱ्यावर जातीय भेदभावाचे आरोप होत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर व संस्थेच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. आरोपांची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी, तसेच संस्थेची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी संबंधित व्यक्तीस पदावरून काढावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!