छोटूच मनही छोटंच ; जातीयवादात मात्र मोठं
जात पाहून घरे देणाऱ्या छोटूला कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही

अमळनेर : म्हणजे कोणत्याही प्रकारचा मळ नसलेलं हे गाव व तालुका आहे. मात्र यात असे काही किडे जन्माला आलेत ज्यांच्यामुळे या गाव व तालुक्याच्या नावाला काळिमा लागत आहे.
जातीच्या आधारावर काही बिल्डर्स घरे देतात, काही जातींना घरे देत नाहीत अशा प्रकारच्या बातम्या दिव्य लोकतंत्रने गेल्या काही वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. आणि त्या विषयावर लढा सुरूच आहे. मात्र जो वणवा बाहेर पेटला होता त्याची आस आता घरात पोहचली असून याचा त्रास स्वतः दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे यांना होत आहे.
समाधान मैराळे यांनी घर घेण्यासाठी अमळनेर येथील बिल्डर छोटू जैन यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी त्यांच्या माणसाला लावून घरे दाखवलीही. मात्र त्यांनी एके दिवशी फोन केला व विचारणा केली की घर नेमकं कोणासाठी हवंय, जेव्हा त्यांना मैराळे यांच्याकडून सांगण्यात आलं की माझ्याच साठी हवंय तर तेव्हापासून मात्र त्यांनी आपला मनाचा व वागण्यातील छोटे पणा दाखवायला सुरुवात केली. तर एके दिवशी त्यांनी सरळ नकारच दिला.
अशा माणसाला कोणत्याही ठिकाणी पदावर राहण्याचा अधिकार आहे का असा सवाल उपस्थित होतो.
तूर्तास एवढेच !
भाग 2 नक्की वाचा….
