सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसीं के बाप का हिंदोस्ता थोडी है !
प्रताप महाविद्यालयात शनिवारी झालेल्या घटनेने निर्मळ अमळनेरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न
बाहेरील व्यक्ती महाविद्यालयात आल्याने गुन्हा दाखल तर इतर कोणत्या अभ्यासाला येतात ?
मुलगा नाव घेत होता तर मुलींनी का गुन्हा दाखल केला नाही ?

अमळनेर : शहर निर्मळ असून काही समाजद्रोही व्यक्तींकडून याच अमळनेरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून कोणत्यानी कोणत्या कारणाने हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न होत असतो. अशीच एक घटना शिक्षणाच्या मंदिरात म्हणजे प्रताप महाविद्यालयात शनिवारी घडली.
एक इतर धर्मीय मुलगा काही मुलींसोबत गप्पा मारत बसला असता त्याला काही गाव गुंडांनी मारले व त्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला भाग पाडले. मात्र कोणाच्या दबावात येऊन प्राचार्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठले व सदर मुलावर गुन्हा दाखल केला. आणि गुन्हाही दाखल झाला त्याचे कारण म्हणजे अवैध रित्या प्रवेश केला.
सार्वजनिक जागा ही कुणाच्या बापाची नसते त्या ठिकाणी कोणीही ये-जा करू शकतो. अनेक कामे लोकांची त्या ठिकाणी असतात. ज्या लोकांचे प्रवेश नाहीत ते शेकडो लोकं प्रताप महाविद्यालयात रोज फिरतात मग ते कोणत्या अभ्यासासाठी फिरत असतात, त्यांच्यावर कोणते गुन्हे आजपर्यंत दाखल झाले? याचे उत्तर प्राचार्य व प्रताप महाविद्यालय प्रशासनाने यांनी देणे गरजेचे आहे. तो मुलगा जर मुलींचे नाव घेत होता तर त्या मुलींनी पोलिसात का तक्रार दिली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.
म्हणून सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसीं के बाप का हिंदोस्ता थोडी हैं !
कारण ज्या पद्धतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्यावरून ह्या ओळी हुबेहूब जुडतात.
