चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण..
पुणे : चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले आहे,
मागण्या पुढील प्रमाणे चर्मकार समाजाच्या बांधवांना सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे घर शासनाने द्यावे संत रोहिदास महाराज यांचे नावाने सभागृह पुणे शहर जिल्ह्यामध्ये उभारण्यात यावे चर्मकार समाज बांधवाला स्टॉल व परवानाधारक महापालिकेने परवानगी द्यावे कष्टकरी गटाई कामगार यांचे महामंडळ स्थापन करावे चर्मकार समाजातील मुला मुलींसाठी शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे संत रोहिदास चर्मद्योग महामंडळामध्ये कर्जापासून स्टॉल पर्यंत जाचक अटी आहेत त्या रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी समाजाची अपेक्षा आहे असे मत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी व्यक्त केले,
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, महाराष्ट्र राज्य सचिव विजय वरछाये, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश बडगे, खजिनदार सुनील राठी, लोहगाव अध्यक्ष यादव शिंदे, गटाई कामगार जिल्हाध्यक्ष सुनील चराटे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शालिकराम सरसरे, चिंतामण बहिरे, उद्योजक प्रकाश पिंपळे, उद्योजक जितेंद्र चवरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रभाकर उतपुरे, गौरी बशेरे, इंदुताई पुरभे, सिंधू शिरे, रेखा बसीरे सविता साळुंखे आदि यावेळी उपस्थित होत,