शिवसेनेतर्फे मोदी व राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन
शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी अमळनेर उबाठा सेना आक्रमक
अमळनेर : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवसेना (उ बा ठा)पक्षा तर्फे नाट्यगृह येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध करत राज्य संघटक ॲड ललिता पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
महाराजांचा पुतळा कोसळला, हे अत्यंत मनाला संताप आणणारे व क्लेशदायक आहे.आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे निषेधार्थच आहे, या पुतळ्याची उभारणी करताना मोठा भ्रष्टाचार राज्य सरकार मार्फत झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी शिवसेना हे आंदोलन करीत असून या पुतळ्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व राज्य गृहमंत्री यांच्या हस्ते झाले आहे. यांनी या काळ्या घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा केंद्र व राज्य सरकार बरखास्त करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहर संघटक मोहन भोई, तालुका संघटक नितिन निळे, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर पाटील, पैलाड महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनिषा परब, महिला शहरप्रमुख उज्ज्वला कदम, नाना ठाकूर, उप तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, विलास पवार, माजी तालुका प्रमुख विजय पाटील, विधानसभा निरीक्षक कारभारी आहेर, शाखाप्रमुख संजय पाटील, माने, राजेंद्र मराठे नाद्री, प्रा आशिष शर्मा, जितेंद्र साळुंखे, बाळा महाजन, विशाल पाटील, भटू पाटील मंगरूळ, नितिन पाटील रंजाणे, ईश्वर नागे पातोंडा, गोरख बाविस्कर सोनखेडी, समाधान पाटील पाडळसरे आदी शिवसैनिक उपस्थित होते