स्वातंत्र्याचे गाणे गाणारे पत्रकार अमळनेरात आजही पारतंत्र्यातच….!
पत्रकार दिन विशेष….
दिव्य लोकतंत्र : “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतं, त्यांनी आपल्या पत्रकारिता व बुद्धिमत्तेने समग्र भारतातील गुलामांना जागृत केले आणि त्या गुलामांनी बंड केला. मात्र आज गुलामांना आम्ही स्वातंत्र्यात आहोत अशा पद्धतीचा गैरसमज झालेला आहे. आणि ज्यांचा गैरसमज जो दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच चुकीचं समजण्याचा गोड प्रयत्न हे गुलाम करीत असतात.
अशीच काहीशी परिस्थिती अमळनेर तालुक्यात सध्या निर्माण झाली आहे. जगात लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे गाणे गाणारे पत्रकारच आज मात्र अमळनेर तालुक्यात सध्या गुलाम झाल्याचे चित्र दिसत आहे. पत्रकारांचा काही गृप काही लोकांचा गुलाम झाला आहे. आणि “हंम करे सो कायदा” असे या लोकांचे जणू सूत्रचं आहे. भांडण या काही मोजक्या लोकांचे आहे आणि वैर मात्र सगळ्यांनी घ्यावे असे सध्या सुरू आहे. माझी संघटना मोठी वाटावी म्हणून ज्यांना बातम्या लिहिता येत नाहीत अशा नालायक लोकांना संघटनेत घेऊन तालुक्यात माझीच संघटना मोठी आहे असे लोकप्रतिनिधी, अधिकारी, पुढारी तसेच इतरांना दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पुढारी आणि जनता या नालायक लोकांमध्ये व खऱ्या पत्रकारांमध्ये फरक जाणत असून त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवतच आहे.
आवाहन….
अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पुढारी आणि जनतेला दिव्य लोकतंत्र आवाहन करीत आहे की, ज्यांच्या तुम्ही बातम्या पाहिल्या आहेत त्यांनाच पत्रकार म्हणून तुमच्या कार्यक्रमात आणि मनात स्थान द्या. कारण ओळखपत्र आज कुणीही मनगटाला नाक पुसणारा घेऊन येतो.शेवटी संघटना ही लोकांसाठी असते लोकं संघटनेसाठी नाहीत हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी आज एवढेच !
उत्तम लेखन करू शकणाऱ्या व सर्व खऱ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
असे प्रत्येक संघटनेमध्ये बिन बुडाचे गडू असतात म्हणून खरं संघटनेवर प्रेम करणारा मनुष्य याने कधीही आपल्या क्षेत्रातील जी काही संघटना असेल त्यासाठी सर्वतोपरी काम केलं पाहिजे कारण आपणच म्हणालात संघटना ही लोकांच्या सेवेसाठी असते म्हणून आपणास पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अधिकाधिक उत्तम तुमची लेखणी बनत जावो, तुमच्या हाताला बळ येओ ,बुद्धीला ताकद मिळो आणि तमाम जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीतून मार्गी लागत राहो हीच या पत्रकार दिनी शुभेच्छा