अमळनेर पोलीस ठाणे अखत्यारीत सुरू असलेले अवैध धंदे थांबवा…. पोलिसांना निवेदन

0

कारवाई न झाल्यास स्वातंत्र्य दिनी उपोषण

 

अमळनेर : पोलीस ठाणे अखत्यारीत सुरू असलेले अवैध धंदे त्वरित थांबवा अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट रोजी उपोषण करु अशा आशयाचे निवेदन आज अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. समाधान मैराळे यांनी दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमळनेर पोलीस ठाणे अखत्यारीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.

शहरात अनेक ठिकाणी सट्टे सुरू असून अनेकांना नुकसान सोसावे लागते. तर दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करतांना दिसते. म्हणून हे अवैध धंदे तात्काळ थांबवा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तर माहिती तथा उचित कारवाईस्तव महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जळगाव पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

दरम्यान आता अवैध धंद्यांवर कधी कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!