दिव्य लोकतंत्रला अडकवण्यासाठी अनेकांची झुंड तयार….

0

सत्यता मांडणे गुन्हा आहे का ?

कर नाही तर डर कशाला हवा !

अमळनेर : गेल्या सहा ते सात वर्षांपासून दिव्य लोकतंत्र सर्व सामान्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी, पीडित लोकांसाठी, समाजातील दृष्ट लोकांच्या विरोधात, अवैध धंदे, निकृष्ट कामे, चुकीच्या पद्धतीने व गैरमार्गाने होणारी कामे, यांच्या विरोधात नेहमी आवाज उठवला आहे. तर हा आवाज गेल्या काही महिन्यांपासून अधिक तीव्र झाला आणि यामुळे अनेकांचे धाबेही दणाणले होते. यामुळे तालुक्यातील अनेकांची झुंड दिव्य लोकतंत्रच्या विरोधात तयार झाली आहे. ही झुंड अनेक कोणत्या न कोणत्या मार्गाने दिव्य लोकतंत्रला अडकवण्यासाठी व दिव्य लोकतंत्रचा आवाज दाबण्यासाठी सज्ज आहे. म्हणून जनतेचा आवाज होऊन सत्यता मांडणे गुन्हा आहे का ? आणि तुम्ही जर काही चुकीचं केलं नाही म्हणजे कर नाही तर तुम्हाला डर कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिव्य लोकतंत्रचा आवाज दाबला जावा यासाठी काही मोठे पुढारी, एखादं दोन अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच  दोन नंबर वाले यांची झुंड म्हणजे फौज तयार झाली आहे. म्हणून यांना दिव्य लोकतंत्र सांगू इच्छित आहे की, तुम्ही तुमचे कामं व्यवस्थित व कायद्यात राहून करा दिव्य लोकतंत्रची काय हिम्मत तुमच्या विरोधात बोलण्याची…. अनेकांनी हप्ते घेत माती खाल्ली असूनही जो याविरोधात आवाज उठवतो त्याला अडकवण्याचा प्रयत्न करायचा याला काय म्हणावे. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली या प्रमाणे काही वागत आहेत. 

कोपऱ्यात येऊन पाय पडणारे अनेक असून मात्र पाठीमागे काही फुटीरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिव्य लोकतंत्रचा शिकार काही लोकं करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जोपर्यंत दिव्य लोकतंत्रच्या डोक्यावर सामान्य जनतेचा व चांगल्या लोकांचे हात आहेत तोपर्यंत दिव्य लोकतंत्रचं काहीच वाकडं होणार नाही हे नक्की !

आणि हा लढा अजून तीव्र होईल हे नक्की !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!