अमळनेरचे 9 अपक्ष नगरसेवक नंदनगरीत
नवीन गट तयार करून नगराध्यक्षांना पाठिंबा देणार

अमळनेर : नगर परिषद निवडणूकीत जनतेने कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नसल्याने दोन्ही पक्षांचा कल अपक्षांकडे वळला आहे. कारण अमळनेर नगर परिषदेत 36 सदस्य संख्या असून तब्बल 12 सदस्य अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यापैकी 9 लोकांनी आज नंदनागरी गाठली असल्याची खात्रीपूर्वक माहिती दिव्य लोकतंत्रच्या हाती आली आहे. हे 9 जण नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना पाठिंबा देणार असून अपक्ष नगरसेवक अमळनेरचा उपनगराध्यक्ष होणार आहे.
दरम्यान आता नंदनगरीत काय हालचाली होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजून येत्या काही काळात अमळनेर शहरात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
