बातम्या लावल्याच्या रागातून अधिकाऱ्याकडून पत्रकाराची मानहानी….
कंट्रोलवरून आलेल्या अधिकाऱ्याने कंट्रोल मध्ये असावे अन्यथा पुन्हा कंट्रोलला जाण्याची वेळ ?
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासुन अधिकाऱ्यास आत्मपरीक्षण करायला भाग पडेल अशा प्रकारच्या बातम्या दिव्य लोकतंत्रकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. अवैध धंदे, चुकीच्या कारवाया, कायदा सुव्यवस्था यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र या बाबत आत्मपरीक्षण करून आपल्या कामात सुधारणा न करता बातम्या लावल्याच्या रागातून एका चुगलखोर व्यक्तीसारखं काही ठिकाणी ह्या अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराची मानहानी केली आहे.
ज्याला कोणत्याच प्रकारे रोखता येत नाही त्याची बदनामी / मानहानी करून रोखण्याचा प्रयत्न केला जातो असे आमच्या अनेक वाचकांचे म्हणणे आहे. मात्र कंट्रोल वरून आलेल्या अधिकाऱ्याने अशा विषयांपासून दूर राहावे म्हणजेच कंट्रोलमध्ये राहावे अन्यथा पुन्हा कंट्रोलला जाण्याची वेळ येऊ शकते असे आवाहन संबंधित अधिकाऱ्याला दिव्य लोकतंत्र करीत आहे.
आपण फक्त काही महिन्यांतच अमळनेरात सट्टे, गुटखा, गांजा, दारू, यांसह गलवाडे रोड प्रकरण, गांधलीपुरा प्रकरण किंवा इतर ठिकाणांहून किती मलई गोळा केली यात आम्ही बोलत नाहीयेत, मात्र जर कारण नसतांना आमची बदनामी करीत असाल तर आम्ही ह्या मलई बाबत माहिती प्रसिद्ध करू शकतो परंतु आपण ज्या विभागात कार्यरत आहात त्याचा आम्हाला गर्व तथा अभिमान आहे म्हणून आमच्याकडून असे काहीही होऊ नये याची आपण काळजी घ्यावी.