अमळनेरात भर वस्त्यांमध्ये अवैध गॅस भरणे जोमात

0

अवैध गॅस भरण्याच्या ठिकाणी झालेल्या स्फोटमुळे पोलीस निरीक्षकांची झाली होती उचलबांगडी….

अमळनेरातही तेच होण्याची वाट पाहताय का ?

 

अमळनेर : अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत अवैध गॅस भरण्याचे प्रमाण मोठे असुन यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. जळगाव शहरात सदर दुर्घटना घडली होती. त्यात सुमारे 7 जण मृत्यूमुखी पडले होते.

जळगाव येथील एम.आय.डी. सी. पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात अवैध गॅस भरण्याच्या ठिकाणी मोठा स्फोट झाला होता. ह्या घटनेत सुमारे 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटना ही डिसेंबर 2025 ला घडली होती. आणि याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले असून त्याची दखल शासन स्तरावर चांगलीच घेतली गेली होती. त्यावेळी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक तथा अमळनेर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षात म्हणजेच कंट्रोल रूमला बदली देखील पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांनी केली होती. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रात अशी घटना घडली, जर त्यांनी याकडे लक्ष दिले असते तर सदर घटना घडलिही नसती. म्हणून त्यांची तात्काळ उचलबांगडी करीत पोलीस अधीक्षक श्री रेड्डी यांनी नियंत्रण कक्षात बदली केली होती.

मात्र या घटनेला वर्ष उलटत नाही तोपर्यंत पोलीस निरीक्षक निकम यांची संवेदनशील असलेल्या अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर घटना पुन्हा घडू नये म्हणून निकम यांनी काळजी घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तर आता सध्या हे धंदे अमळनेर पोलीस ठाणे अखत्यारीत राजरोसपणे सुरू असून यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील भर वस्तीत हे व्यवसाय सुरू असून जर दुर्घटना घडली तर जळगाव पेक्षा मोठी हानी अमळनेर शहरात होऊ शकते. अमळनेर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळण्यास श्री निकम हे अपयशी असल्याची चर्चा असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांनी विचार करावा हीच अपेक्षा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!