श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

0
IMG-20260816-WA0008

 

 

अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय प्रार्थना, प्रतिज्ञा, संविधान वाचन आणि ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले. त्यानंतर शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी व प्रविण पुरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले.

यावेळी मंचावर जया जैन, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, भारती आठवले, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, समीक्षा जैन, शाम पवार तसेच शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली. गुणवंत विद्यार्थिनी तसेच नुकत्याच डेहराडून, उत्तराखंड येथे झालेल्या आइस स्केटिंग हॉकीच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या नूतन किशोर भोई ह्या विद्यार्थिनीचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडण्याबरोबरच ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वी करण्यासाठी विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका आर. एस. सोनवणे यांनी केले. मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!