प्रशासनासह सर्व सुस्त झोपेत असतांना रात्री 2 वाजेनंतर वाळू माफियांच्या सुळसुळाट….
15 ते 20 ट्रॅक्टर बोरीत

अमळनेर : तालुक्यातील अवैध वाळू उपसा विरोधात विविध माध्यमातून आवाज उठत असतांना, पत्रकार विविध वृत्त प्रकाशित करीत असूनही अवैध वाळू उपसा थांबायला तयार होत नाहीये. महसूल विभाग सुस्त झोपेत असून काही तलाठी मात्र रात्रीचा खेळ खेळत आहेत. तलाठ्यांनी सांगितलं की रस्ता क्लीअर आहे तर मग सुरू होते वाळूची अवैध वाहतूक…..
असाच प्रकार रात्रीही घडला आहे. उगवत्या रविवारी पहाटे 2 वाजता सुरू झालेला वाळूचा खेळ उजेड पडेपर्यंत चालला. सुमारे 15 ते 20 ट्रॅक्टर रात्री बोरीत उतरले होते. यामध्ये हजारो ब्रास वाळू चोरीस गेली असून शासकीय गौण खनिजाचा मोठी लूट झाली आहे. तर रात्रीच्या या खेळात दोन्ही गट असून दोन्ही गटांनी मिळून मिसळून वाळू उपसा केला आहे. बाळू, भय्या, भय्या, दादू असे अनेक असून यात त्यांना तलाठ्यांनी देखील साथ दिली आहे. 2 तलाठी यात सहभागी असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.
