शेतकरी दाखल्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार दाखल….
तहसीलदार, मंडळ अधिकारी, संबंधित वेंडर व डीटीपी सेंटर चालकांची चौकशी होणार ?
अमळनेर : तालुक्यात झालेल्या शेतकरी दाखल्यातील गैरप्रकार बाबत राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली असून अमळनेर तहसीलदार, संबंधित मंडळ अधिकारी, संबंधित वेंडर, व डिटीपी सेंटर चालक अशांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमळनेर तालुक्यात शेतकरी दाखले देतांना तहसीलदार झोपले होते का, तालुक्यात अनेक बोगस शेतकरी दाखले आहेत, मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची बातमी काल शनिवारी दिव्य लोकतंत्रने प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित केल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व महाराष्ट्राकच्या महसूल मंत्र्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ज्या सातबारावर शेतकरी दाखला असणाऱ्या व्यक्तीचे नाव नाही असे दाखले वितरित करण्यात आले आहेत. यात लाखो रुपये अधिकाऱ्यांनी उकळले असून त्या अधिकाऱ्याच्या नावासह इतर माहिती देखील तक्रारीत देण्यात आली आहे. म्हणून सदर चौकशी नक्की होईल व या प्रकरणातील दोषींवर कारवाई देखील होईल अशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे.
