अमळनेरात प्रामाणिकपणाचे उदाहरण
सापडलेले २५ हजार रुपये मालकाला परत

अमळनेर : शहरातील शहा आलम नगर परिसरात प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. शहा आलम नगर भागात २५ हजार रुपये रोख रक्कम पडलेली अब्दुल हनीफ शेख (नथु) रा. शहा आलमनगर, अमळनेर यांना मिळून आली.
सदर रक्कम स्वतःकडे न ठेवता त्यांनी तत्काळ अमळनेर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्याकडे जमा केली. पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी सखोल चौकशी करून सदर रक्कम इसामोद्दीन शेख यांची असल्याची खात्री केली.
योग्य पडताळणीनंतर आज रोजी २५ हजार रुपयांची रक्कम इसामोद्दीन शेख यांच्या ताब्यात देण्यात आली. अब्दुल हनीफ शेख यांच्या प्रामाणिकपणाचे तसेच पोलीस प्रशासनाच्या तत्पर कारवाईचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस हवालदार सुनील तेली, मयूर पाटील सामाजिक कार्यकर्ते गुलाम नबी पठाण उपस्थित होते.
