पुणे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निर्णय
८ आठवड्यात भरतीबाबत सफाई युनियनला कळवण्याचे महापालिकेला दिले आदेश…
पुणे : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन विरुद्ध पुणे महानगरपालिका, या प्रकरणी सफाई कामगार युनियनने 20 जुलै 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिकेच्या कामगार भरतीच्या जाहिरातीला आव्हान देण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये सफाई कामगार द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणी भरतीमधील सफाई कामगार या भरतीपासून वंचित असल्याचे कामगार युनियनकडून सांगण्यात आले होते. या भरतीमध्ये कंत्राटदारांकडून मनमानी सुरू असून, युनियनमधील काही कामगारांना केवळ नावावर रोजंदारीवर ठेवण्यात आले असून, उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांनाही महापालिकेने तडकाफडकी बडतर्फ केले आहे. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने सफाई कामगार युनियनच्या हिताचा निकाल दिला आहे.
याप्रकरणी सफाई कामगार युनियनचे कायदेशीर सल्लागार एड. राशीद सिद्दीकी यांनी सांगितले की, 2013 मध्ये युनियनच्या वतीने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेत स्पष्टपणे असे म्हटले होते की, पुणे महापालिकेच्या भरतीमध्ये सफाई कामगार युनियनच्या कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. या प्रकरणी औद्योगिक न्यायालयाने पुणे महापालिकेने दुसऱ्या, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती सफाई कामगार युनियनच्या संमतीने करावी, असा आदेश देखील दिला होता. औद्योगिक न्यायालयाच्या या आदेशानंतरही महापालिकेने यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने सफाई कामगार युनियनने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे नितीन जामदार यांनी या प्रकरणी निकाल देताना पुणे महापालिकेने कायदेशीर बाबींचे पूर्णपणे पालन करावे आणि सफाई कामगार विभागात भरती करताना या पदावर कायदेशीर पात्र असलेल्यांना भरतीपासून वंचित ठेवता कामा नये असा आदेश दिला आहे. तसेच 8 आठवड्याच्या आत, सफाई कामगार युनियनला कळवावे आणि युनियनच्या समन्वयाने भरती प्रक्रिया पूर्ण करून 8 आठवड्यात या कामगारांना सामावुन घेणे असे कळविले आहे.
या रीट याचिकेवर ऍड तेजस धांडे, ऍड विशाल नवले, ऍड भरत गाढवी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे काम पाहिले.
तसेच या कायदेशीर लढाईत संघटणेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, तेजस्विनी सडेकर, सूर्यकांत यादव, अंकुश म्हेत्रे, सुनील पवार, बाबा गोनेवार, रवी बेंगळे आणि एड सपना मेलकरी यांनी पाठपुरावा केला आहे.