लोहगाव येथील कलवड वस्तीमधील नागरिकांना मूलभूत सुख सुविधा मिळण्यासाठी आंदोलन
वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पुणे महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन
पुणे (लोहगाव) : येथील कलवड वस्तीमध्ये दलित वंचित अल्पसंख्यांक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून येथील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे दुय्यम वागणूक देण्यात येत आहे परिसरात साधारण 20 ते 30 हजार नागरिक राहत असून या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून त्याकरिता वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते,
यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना वंचित बहुजन आघाडी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते,
यावेळी सोमनाथ पानगावे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर, विशाल कसबे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, पुणे शहर महिला आघाडी सचिव सारिका फडताळे, पुणे शहर उपाध्यक्ष विनोद जाधव, पुणे शहर सचिव स्वप्निल वाघमारे, शुभम चव्हाण, ओमकार कांबळे, नसीमा रफिक शेख, बियामा रुस्तम शेख, आदि यावेळी उपस्थित होते,
कलवड येथे हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाण्याची टाकी, नागरिकांना पिण्याकरिता कमी दाबाने पाणी येत असून, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी उद्यान व येथील राहणारे मुस्लिम बांधवांना कब्रस्तान व हिंदूंसाठी स्मशानभूमी बांधण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी यावेळी आंदोलन करण्यात आले होते