CNG गॅससाठी लागलेल्या रिक्षांच्या लाईनीला नागरिक त्रस्त…
स्वारगेट वाहतूक पोलिसांना निवेदन
पुणे : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत CNG गैस पंपावर रिक्षांची वारंवार लाईन घरापर्यंत आलेली असते व यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, या विरोधात स्थानिक नागरिकांकडून स्वारगेट वाहतूक पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.. मंगळवार 20 ऑगस्ट रोजी हे निवेदन देण्यात आले आहे. डायस प्लॉट येथील एम. एन. जी. एल. गॅस पंपामुळे होणारा त्रास कमी करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या गॅस पंपाच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिक नागरिक, विध्यार्थी, महिला यांच्या तक्रावरून सर्व पक्षीय प्रमुख पदाधीकारी गणेश शेरला ( भाजपा झोपडपट्टी आघाडीचे ) तोसिफ पठाण (महासचिव पर्वती विधानसभा वंचित बहुजन आघाडी ), बाळासाहेब शेलार (सरचिटणीस पर्वती वि सभा आरं पी आय ), सलीम सय्यद (अध्यक्ष प्रभाग 28 म न से ), युसूफ मोमीन पदाधिकारी शिवसेना उ बा ठा, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांच्या वतीने निवेदन देत आमची वस्तीची आमची समस्या असे म्हणत लवकरात लवकर आमची समस्या मिटवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया….
CNG गॅस पंपावर येणाऱ्या रिक्षांची भली – मोठी रांग या वस्तीत लागलेली असते. यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिकांनी आमच्याकडे या बाबत तक्रार केली होती, त्यानुसार आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन स्वारगेट वाहतूक पोलिसांना निवेदन दिले आहे. अपेक्षा आहे की लवकरात – लवकर नागरिकांना होणारा हा त्रास बंद होईल…
गणेश शेरला – झोपडपट्टी आघाडी भाजपा