पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात शिव्या मुक्ती अभियान
शिव्यामुक्तीवर वर्षभर अभियान चालणार
अमळनेर : पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर व मास्वे यांचे संयुक्त विद्यमाने शिव्यामुक्त समाज अभियान रावण्यात आले याच थीमवर वर्ष भर अभियानामध्ये
बुधवारी MASWE चे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते नागपूर यांचे प्रेरणेने समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करणेत आला होता. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजीत भांडारकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील त्यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता खेडकर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सर्वरया, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उदय महाजन, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सर्वया, डॉ. भरत खंडागळे, डॉ. सागर राज चव्हाण, डॉ. जगदीश सोनवणे, प्रा.धनराज ढगे आदी कर्मचारी वर्ग, बीएसडब्ल्यू तसेच एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थी यांनी शिव्या मुक्त समाज अभियान अंतर्गत महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या मूल्याचा आदर व मूलभूत कर्तव्याचे पालन करीन , जात ,धर्म, पंथ, पद ,वय यावरून कुठलाही भेदभाव करणार नाही तसेच अन्यत्र माता भगिनींचा व एकूण स्त्रीत्वाचा अनादर करणारे, अपशब्द शिव्या वापरणार नाही व शिव्या मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संविधानिक व शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीन अशी शपथ घेतली.