हर्ष शिंपीचे उर्फ पवन पैलवान राज्यस्तरीय ज्युदो चॅम्पियन लींग स्पर्धेत वर्चस्व.

0

अमळनेर : नाशिक जिल्हा ज्युदो असोसिशन मित्र विहार संस्था यशवंत व्यायामशाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र ज्युदो असोसिशन यांच्या मार्गदर्शनाखाली मीना ताई ठाकरे क्रीडा संकुल येथे तिसऱ्या राज्यस्तरिय ज्युडो चॅम्पियन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हातील खेळाडूंची निवड करुन क्रिकेट आयपीएल प्रमाणे आठ संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत अमळनेरचा हर्ष प्रताप शिंपी ह्या खेळाडूने अंकाई अटॅकरर्स या संघाकडून सहभागी झाला होता. त्याने या स्पर्धेत अंतिम सामन्यात तोरणा टायगर संघाच्या महेश माने याला  73 किलो वाजन गटात हरवत आपल्या संघाला तिसरा क्रमांक मिळवुन दिला. त्याने या स्पर्धेत 9 पैकी 7 सामने जिंकत स्पर्धेत आपले वर्चस्व ठेवले. पूर्ण टीमला 71 हजार बक्षीस देण्यात आले आहे. ब्रांस मेडल व ट्रॉफी या कामगीरीसाठी अंकाई अटॅकरर्स संघाचे मालक अविनाश वाघ त्यांचे वडील मा. नगरसेवक प्रताप शिंपी जयहिंद व्यायाम शाळा, कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी अमळनेर व क्रीडा प्रेमींकडून हर्ष शिंपी याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!