विनयभंग करून महिलांना मारहाण ; सुमारे 12 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

0

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातली घटना

अमळनेर : शहरातील ताडेपुरा भागात राहणाऱ्या दोन महिलांचा शहरातीलच बहादरपूर रोड कंजरवाडा येथील सुमारे 12 जणांनी विनयभंग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या बाबत अमळनेर पोलिसात भारतीय न्याय संहिता 2023 नुसार विनयभंग, मारहाण यांसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात फिर्यादी तिच्या परिवारासह राहते. आरोपींच्या सोबत सदर महिलेचे व तिच्या परिवाराचे मागील भांडणाच्या कारणाने बोलणे चालणे बंद होते. मात्र गुरुवारी दुपारी महिला घरी असतांना बहादरपूर रोड कंजरवाडा वरील सुमारे 12 जणांनी सदर महिलेच्या घरासमोर जाऊन तिला काहीही विचारपूस न करता शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व चापटबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे तिच्या पोटाला मुकामार लागण्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीची चुलत सून भांडण सोडवायला गेली तेव्हा तिच्या डोळ्यात मिर्ची टाकून तिच्या पायावर काठीने मारहाण करण्यात आली व तिचा विनयभंग करण्यात आल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान मीनाक्षी कंजर, नितीन तमाईचे, सचिन तमाईचे, तुषार गुमाणे, सुमनबाई तमाईचे, सोमा तमाईचे, नैना बाटूगे, बेलाबाई कंजर, प्रिया बागडे, गब्बूबाई बागडे, नरेंद्र गुमाणे, प्रिंतेश बागडे सर्व राहणार बहादपूर रोड कंजरवाडा अमळनेर अशा सुमारे 12 जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार विनयभंग, मारहाण यांसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!