दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार

0
IMG-20261125-WA0008

हार, शाल, बुके न आणता शेतकरी राजाला मदत करा

 

 

अमळनेर : जळगाव जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीने हे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

       आज दि. २५ नोव्हेंबर रोजी जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी हा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा तालुक्यात पावसाअभावी शेतकरी बांधव अडचणीत आहेत. पिके करपली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

 

 

        या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, वाढदिवसानिमित्त कोणीही हार, शाल अथवा बुके आणू नयेत.

       त्याऐवजी शेतकरी बांधवांना दिलासा देणारे सामाजिक व मदतीचे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा. गरजू शेतकऱ्यांना मदत, अन्नदान, पाणी वाटप, आरोग्य शिबिर असे समाजोपयोगी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने वाढदिवसाची सार्थकता साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

       जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!