मा. संजयजी भोकरे निःस्वार्थी, निःस्पृह भावनेने काम करणारे व्यक्तिमत्त्व : डाॅ. विश्वासराव आरोटे
हजारो पत्रकारांच्या आधारस्तंभाचा आज वाढदिवस
वाढदिवस विशेष लेख : मा.संजयजी भोकरे राज्यातील ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यासाठी राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक, दैनिक महानगरी व दैनिक जनप्रवास या दैनिकांचे संपादक तथा अंबाबाई तालिम संस्था मिरज, सांगली या संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त, आमचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब प्रयत्नशील आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा…
माननीय संजय भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार बंधूंनी दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा काढली, ही यात्रा २८ जिल्ह्यांतील २४८ तालुक्यातून मंत्रालयात पोहोचली. पत्रकारांच्या १४ मागण्यांवर मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार पंकजाताई मुंडे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. पत्रकारांचे आर्थिक विकास महामंडळ व वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ स्थापन करावे, या मागणीवर महायुती शासनाने निर्णय घेण्याचे मान्य केले.डिजिटल मीडियाची स्थापना करून नामदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित करून डिजिटल मीडियाचे पहिले अधिवेशन माननीय श्री. भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या अधिवेशनात डिजिटल मीडियाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आलेली होती, त्या नुसार शासनाकडून ही मागणी मान्य करण्यात आली.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून भोकरे साहेबांनी नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग नोंदवलेला आहे. कोरोना कालावधीत मृत्यू झालेल्या पत्रकारांना संपादकांकडून आर्थिक मदत देण्यात आली. गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांचा वर्षभर संघाच्या विविध जिल्ह्यातील शाखांमार्फत गौरव केला जातो. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. त्याचबरोबर आपत्तीग्रस्त भागात विविध मदत केली जाते. दीपावली सणानिमित्त मिठाई वाटप, पंढरपूर यात्रेत सहभागी वारकऱ्यांना छत्र्या, रेनकोटचे वाटप इत्यादी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षी घेतले जाते. यावर्षी माननीय नामदार संजय शिरसाठ, माननीय नामदार अतुल सावे यांना अधिवेशनात आमंत्रित करून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून हे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.ग्रामीण भागात जोडलेली पत्रकारांची मोट महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित न ठेवता गोवा, दिल्ली, बेळगाव, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा इत्यादी ठिकाणी पत्रकार संघाबरोबरच ऑल इंडिया जर्नालिस्ट संघटनेची स्थापना केली व सर्व पत्रकार बंधूंची मूठ बांधली. अनेक ठिकाणी पत्रकार भवन उभे केले. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व सर्व पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.राज्यातील बहुसंख्य वर्तमानपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाशी जोडले गेले आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र या भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारून पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, आजत्याला यश मिळालेले आहे. राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन उभारले असून पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात, उच्चशिक्षणातही सवलती मिळाव्यात तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत. या बरोबरच राज्यातील पत्रकारांना देशाच्या राजधानीत थांबण्यासाठी पत्रकार भवन उभारले आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी देखील पत्रकार संघाच्या सभासदांसाठी पत्रकार भवन उभारले आहे. सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण, शासकीय विश्राम गृहांवर प्राधान्यक्रम, टोल नाक्यावर सवलत, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा ठेवण्यासाठी भोकरे साहेब प्रयत्नशील आहेत.
अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य
दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो. ग्रामीण पत्रकारांना विविध सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. संघाचे राज्यात विविध ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरू असून सामाजिक नाळ जोडली जात आहे. ग्रामीण भागासह वर्तमानपत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व संघाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. संघटना कोणतीही असो मात्र पत्रकारांना संरक्षण, त्यांच्या कार्याची दखल घेणारी संघटना भविष्यात पत्रकारांना तारू शकते, त्यासाठी संघटनामार्फत विभागनिहाय अधिवेशने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव उपक्रम सुरू आहेत. गुणवंतांच्या पाठीवर भोकरे साहेब नेहमीच शाबासकी देत आले आहेत. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सभासद आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे काम सातत्याने होत आहे. अनेक पत्रकारांना हलाखीच्या परिस्थितीत पत्रकार संपादकांकडून आर्थिक मदत केली जात आहे. संघाचे सभासदांना अधीस्वीकृत कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. समाजातील विविध घटकांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पत्रकार संघाकडून गौरविण्यात येत आहे. यासाठी मा. भोकरे साहेबांचे मार्गदर्शन मिळत आहे. संघामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक, पत्रकारिता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. तसेच राज्यभरात पत्रकारांची मूठ बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे साहेबांच्या कल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलिकडे झाला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मा. भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, करीत राहणार आहे. साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

डॉ. विश्वासराव आरोटे
प्रदेश सरचिटणीस
म.रा.म.पत्रकार संघ, मुंबई
