टायर फुटल्याने वाहन पलटी; २२ वर्षीय गोलू पठाण यांचा मृत्यू

0
IMG-20260825-WA0052

सारबेटा गावाजवळील दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान धुळ्यात घेतला अखेरचा श्वास

 

अमळनेर : तालुक्यातील सारबेटे गावातील गोलू पठाण (वय २२) याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास छोटा हत्ती वाहनातून प्रवास करत असताना वाहनाचा अचानक टायर फुटल्याने गाडी पलटी झाली.

या अपघातात गोलू पठाण हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्यास तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी  पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला.

यानंतर धुळे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. या दुर्दैवी घटनेने सारबेटे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!