मंगरूळजवळ भीषण अपघात; 5 ठार, 1 गंभीर तर 1 किरकोळ जखमी

0
IMG-20260609-WA0021

मंगरूळजवळ भीषण अपघात; 5 ठार, 1 गंभीर तर 1 किरकोळ जखमी

 

अमळनेर : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ हॉटेल वृंदावन परिसरात मंगळवारी (दि. ९) सकाळी सुमारे ७ वाजता कार, मोटारसायकल आणि एसटी बस यांचा तिहेरी भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल (एमएच-१८ सी-८७१९) आणि एसटी बस (एमएच-१३ सीयू-७५४०) अमळनेरहून धुळ्याकडे जात होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने येणारी कार (जीजे-१९ एएफ-३१४७) भरधाव वेगात समोरून आली आणि मोटारसायकल तसेच एसटी बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील पाच जणांचाही जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, महाजन कुटुंबीय अमळनेर येथे एका साखरपुडा कार्यक्रमासाठी येत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एका जखमीस धुळे जिल्हा रुग्णालयात तर किरकोळ जखमीस अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!