तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
Screenshot_2026-06-07-10-22-14-356_com.google.android.googlequicksearchbox-edit

 परिसरात हळहळ

अमळनेर : शहरातील त्रिकोणी बगीचा परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण घरात असताना ही घटना घडली. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!