जमिनीच्या वादातून शिवीगाळ व धमकी

0

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे
प्रतिनिधी : राहुरी (अहिल्यानगर)  


अहिल्यानगर : जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात जमीन खरेदीच्या वादातून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्योती प्रवीण लाटे (वय ३२, रा. चिंचोली, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दि. ७ एप्रिल २०२६ रोजी चिंचोली येथील गट क्रमांक ४०२ व ४०३ मधील सुमारे ८६ आर शेती जमीन खरेदी करून ताबा घेतला होता.

त्याच दिवशी सायंकाळी सुमारे साडेआठ वाजता त्या आपल्या नातेवाईकांसह शेतात गेल्या असता, शेजारील गट क्रमांक ४०१ मधील शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातून पिवळ्या रंगाच्या जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता.
यास विरोध केल्यावर आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत धमक्या दिल्या. “आम्हाला आडवे आला तर तुमच्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी विनोद अण्णासाहेब भोसले, गणेश अण्णासाहेब भोसले, शिवाजी गुलाब भोसले, अण्णासाहेब सारंगधर भोसले व किशोर बाबासाहेब भोसले (सर्व रा. चिंचोली, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

दिव्य लोकतंत्र या न्यूज वेब पोर्टल व चॅनलसाठी पत्रकार / प्रतिनिधी हवेत : संपर्क 7796112894

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!