राहुरी विधानसभा पोटनिवडणूक – फेरी क्र. 5 मध्ये कर्डीले यांची दमदार आघाडी

0

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक – फेरी क्र. 5 मध्ये कर्डीले यांची दमदार आघाडी

 


 

प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे
प्रतिनिधी राहुरी (अहिल्यानागर)

 

 


राहुरी : विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या उत्साहात सुरू असून, फेरी क्रमांक ३ चा निकाल जाहीर झाला आहे. या फेरीत अक्षय कर्डीले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट व मोठी आघाडी घेतली असून, विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल मजबूत होताना दिसत आहे.

फेरी क्रमांक ३ मधील आकडेवारीनुसार, अक्षय कर्डीले यांना तब्बल 25408 मते मिळाली आहेत. त्यांच्या तुलनेत इतर उमेदवार मोठ्या फरकाने मागे राहिले आहेत.

गोविंद मोकाटे यांना 3522 मते, संतोष चोळके यांना 1438 मते मिळाली आहेत.
तसेच रावसाहेब खेवरे 1603, अथर्व म्हसे 277, 
दरम्यान, NOTA ला 303 मते मिळाल्याची नोंद आहे.

या फेरीत कर्डीले यांनी मिळवलेली आघाडी लक्षवेधी ठरत असून, मतमोजणीच्या पुढील फेर्‍यांमध्ये ही आघाडी कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालाचा कल हळूहळू स्पष्ट होत असला तरी अंतिम चित्र समोर येण्यासाठी अजून काही फेर्‍यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत असून, समर्थकांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे. सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे.

“दिव्य लोकतंत्र” कडून पुढील अपडेट्स सतत दिले जातील.

 


दिव्य लोकतंत्रसाठी पत्रकार प्रतिनिधी हवेत, संपर्क : 7796112894

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!