तहसीलदारांच्या नावाने ५० हजारांची लाच मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर : तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. रामराव हरचंद पाटील (रा. लोणगाव, ता. अमळनेर) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (रा. झाडी, ता. अमळनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतूक व्यवसाय असून त्यांच्या दोन ट्रॅक्टरसाठी वाळू वाहतुकीचे काम सुरू होते. याच संदर्भात तहसीलदारांच्या नावाने आरोपींनी तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी २५,००० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान जितेंद्र पाटील यांनी २५,००० रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक उभाग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक पद्माकर कळस व तपास अधिकारी यशवंत बोरसे यांच्या पथकाने केली.
सखोल विश्लेषण बुधवारी नक्की वाचा….
