बाईच्या आड उच्चब्र प्राध्यापकाची अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रयत्न….
आरोपांचा स्फोट की कट ?
प्राध्यापकाच्या बाजूने अनेक मोठे खुलासे

अमळनेर : महाविद्यालयीन प्राध्यापकावर छेडछाडीचे आरोप झाल्याने शहरात खळबळ उडाली असली, तरी या कथित प्रकरणाची दिशा आता बदलताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, आरोपांमागे पूर्वनियोजित बदनामीचा कट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेस कथित घटना घडल्याचा दावा केला जात आहे, त्या वेळी संबंधित प्राध्यापक एम.एस.डब्ल्यू. (द्वितीय वर्ष) परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी महाविद्यालयात विद्यापीठाचे प्रतिनिधी व इतर सहकारी प्राध्यापकही परीक्षा ड्युटीवर उपस्थित होते. त्यामुळे त्या वेळेस महाविद्यालयात नियमित परीक्षा प्रक्रिया सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडला असता, तर त्याबाबत ठोस माहिती समोर आली असती, असा मुद्दा पुढे येत आहे.
अशा परिस्थितीत संबंधित प्राध्यापक प्रत्यक्ष घटनास्थळी होते का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच, साक्षीदार म्हणून ज्यांची नावे पुढे केली जात आहेत, त्या काही व्यक्ती संबंधित वेळेस महाविद्यालयात उपस्थित नव्हत्या, अशी माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आरोपांची विश्वसनीयता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, तक्रारदार महिलेबाबतही काही महत्त्वाच्या बाबी पुढे येत आहेत. काही माध्यमांनी त्यांना “विद्यार्थिनी” म्हणून संबोधले असले, तरी संबंधित महिला विद्यार्थिनी नसून एका पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याचे समजते. संबंधित पदाधिकारी आणि प्राध्यापक यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचीही चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर, हा संपूर्ण प्रकार संबंधित प्राध्यापकाची प्रतिमा मलिन करण्यासाठी आखलेला डाव असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस ठाण्यात एनसी (Non-Cognizable) नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे “आरोप की कट?” हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
घटना घडल्याचा दावा एकीकडे असताना, दुसरीकडे प्राध्यापक परीक्षेच्या ड्युटीवर होते, साक्षीदारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह आहे, “विद्यार्थिनी” की पदाधिकाऱ्याची पत्नी, तसेच वैयक्तिक वादाचा कोन—या सर्व बाबी अनेक प्रश्न निर्माण करत आहेत.
सत्य काहीही असो, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र आरोप खोटे ठरल्यास बदनामीचा कट रचणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणे तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.
