12 वी स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप स्पर्धा अमळनेरात

0

20 ते 22 सप्टेंबर पासून स्पर्धेचे आयोजन… पत्रकार परिषद घेऊन आयोजकांनी दिली माहिती

 

अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज हॉल येथे दिनांक 20 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान 12 वी स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. या बाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आयोजकांनी माहिती दिली. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध 20 ते 25 जिल्ह्यांतील 400 ते 500 खेळाडू सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या स्पर्धेत बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, आणि पॅनक्रेशन या खेळांचा समावेश आहे. स्पर्धा कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर अशा सर्व वयोगटांतील महिला व पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत.

ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी म्हणून आयोजित करण्यात येत आहे. निवडलेला महाराष्ट्र संघ 3 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान देहरादून, उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. याच राष्ट्रीय स्पर्धेतून बेल्ट रेसलिंग सीनियर वयोगटातील महिला व पुरुष खेळाडूंच्या एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.

एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 18 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोहिमा, नागालँड येथे नागालँड सरकार आणि ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ सहभागी होणार आहेत. तसेच, ज्युनियर वयोगटातील खेळाडूंसाठी उझबेकिस्तान, नुकूस येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी मुला-मुलींचा संघ निवडला जाणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.

अमळनेरमधील सर्व क्रीडा रसिक, खेळाडू, आणि क्रीडा संघटकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या प्रतिष्ठित स्पर्धेची शोभा वाढवावी, असे विनंतीपर आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पत्रकार परिषद वेळी स्पर्धेचे आयोजन संघटनेचे राज्याध्यक्ष सी.ए. तांबोळी, जळगाव जिल्हा सचिव सचिन वाघ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य बुकी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!