खबरदार जर अमळनेर शहरात जातीय तेढ निर्माण केला !
काही दिवसांपासुन फिरताय जातीय तेढ निर्माण करणारे मॅसेज
अमळनेर : शहराची स्वच्छ प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न सध्या काही समाजकंटक करीत आहेत. ही बाबत अत्यंत खेदजनक असून या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
संत सखाराम महाराज यांची पावन भूमी व सानेगुरुजी यांची कर्मभूमी असणाऱ्या अमळनेर शहरात असे होणे अशोभनीय आहे. पोलीस प्रशासनाने त्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. मात्र त्या पोलिसांना देखील काही लोक टार्गेट करतांना दिसत आहेत. आमच्याकडून बोलले म्हणजे चांगले आणि कायद्याने किंवा न्यायाच्या बाजूने बोलले तर पोलिसही वाईट ही कोणती पद्धत झाली ?
एखाद्या समाजावर बहिष्कार टाकणे कायद्याचे उल्लंघन आहे, म्हणून जे सामाजिक तेढ निर्माण करणारे मॅसेज सध्या तालुक्यातील काही सामाजिक माध्यमांवर फिरत आहेत त्यावर पोलिसांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे गरजेचे आहे.
ह्या चर्चा व सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या मॅसेज बाबत बुद्धिजीवी लोकं चिंतेत असून त्यांनी चेतावणी दिली आहे की खबरदार जर अमळनेर शहरात जातीय तेढ निर्माण केला !