धनगर समाजाला तात्काळ सूचित जमातीत समाविष्ट करा…
अमळनेर – सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदार यांना निवेदन
अमळनेर : येथे धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून शिक्षित तरुण अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज उपोषणाचा दहावा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे तरीही सरकारकडून या उपोषणाची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही याचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र निषेध करीत आहेत .आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी अमळनेर तहसीलदार यांच्यावतीने अनिल परदेशी यांना सदर धनगर समाजास तात्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तालुका अध्यक्ष एस.सी.तेले, मौर्य क्रांती संघ प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, भाजप माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे, हमाल मापाडी संघ अध्यक्ष रमेश देव शिरसाठ , प्रा. लक्ष्मण निळे , मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, गुलाबराव भागवत -सरपंच करणखेडा, आलेश धनगर -उपसरपंच निंभोरा, ए. बी .धनगर सर ,दिलीप ठाकरे – माजी सरपंच धानोरा, अनिल नहाळदे, धनराज लांडगे, जितेंद्र भालेराव ,भगवान धनगर ,राजू मोरे, ईश्वर हडप, विजय मोरे, विकास सूर्यवंशी, भाऊलाल पाटील, सचिन सिरसाठ, गणेश पाटील , उत्तम धनगर, निखिल बोरसे, प्रा.आर पी धनगर ,रवींद्र लांडगे, निवृत्ती कंखरे, सौरव भागवत, गोविंदा लांडगे उपस्थित होते.