विधानसभेआधी सामाजिक माध्यमांवर राजकिय युद्ध…
अमळनेरची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे

अमळनेर : येत्या एखादं दोन महिन्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्या आधीच अमळनेर विधानसभेतील पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून चांगलेच घमासान होताना दिसत आहे. आणि यामुळे अमळनेरची आगामी विधानसभा निवडणुक चांगलीच रंगण्याचे चिन्हे देखील आहेत. जणू हे राजकिय युद्धच त्यांच्या कडून लढले जास असल्याचा भास होतो.
आघाडी व युती यांचे जागा वाटप ठरलं नसल्याने अनेक पक्षात देखील दुफड्या निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस यांचे जिवंत उदाहरण मतदार संघाला दिसत आहे. या दोन्ही पक्षात डझनच्या वर उमेदवार तयार झाले आहेत. म्हणून त्यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे. तर या इच्छुक उमेदवारांचे देखील काही कार्यकर्ते समाज माध्यमांवर सक्रिय झाले असून ते देखील एकमेकांना घरचा आहेर देत आहेत.
तर मंत्री अनिल पाटील यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात तोफा डागल्या जात आहेत. तुतारी समर्थक व इतर नावांनी सुरू असलेले फेसबुक खात्यांवरून व व्हाट्सएपच्या माध्यमातून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या काही कार्यकर्त्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात अनिल पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.
तर मंत्री अनिल पाटील यांच्या कडून देखील त्यांचे कार्यकर्ते या टिकांना उत्तम प्रकारे उत्तर देत आहेत.
दरम्यान सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम वेगळा नको व्हायला हीच अपेक्षा !
