परेश शिंदे यांची राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी निवड

0

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर : तालुक्यातील बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा इंजिनीअर परेश यशवंतराव शिंदे यांची नूकतीच अमळनेर तालुका युवक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांच्यावर अमळनेर युवक तालुका अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची निवडीबद्दल अमळनेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सरचिटणीस तिलोत्तमा रविंद्र पाटील, प्रा. अशोक पवार, संभाजी बिगेडचे श्याम पवार, ग्रंथसेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, रीटा भुपेंद्र बाविस्कर, अनंत निकम, गोर्वधनचे माजी सरपंच श्यामकांत पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, प्रविण देशमुख, ईंजिनियर शुभम सोनवणे, दिनेश वाहेगवकर, नरेंद्र पाटील, दिनेश साळुंखे, योगेश पाटील, सागर पाटील, मयूर पाटील, आदींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!