तिलोत्तमा पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
अमळनेरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत शरद पवार यांची भेट

अमळनेर : तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी अमळनेर येथील काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली आहे. तर पक्ष सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी अमळनेरचे नूतन शहर कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख व नूतन युवक तालुका अध्यक्ष परेश शिंदे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.
अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील, नूतन शहर कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, नूतन युवक तालुका अध्यक्ष परेश शिंदे, डॉ. प्रशांत शिंदे, गोवर्धनचे माजी सरपंच शाम पाटील, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, शुभम सोनावणे, मयूर पाटील, अक्षय चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
प्रतिक्रिया…

गेल्या वर्षानुवर्षांपासून मी राष्ट्रवादी व पवार साहेब यांच्या सोबत काम करीत आहे, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला वेळोवेळी अनेक पदे दिलीत, व मी त्या पदांना न्याय देखील दिला आहे. मी विधानसभा निवडणुक लढवावी अशी अनेक कार्यकर्ते व राष्ट्रवादी पदाधिकारी यांची इच्छा आहे, मतदार संघात माझा चांगला संपर्क देखील आहे. म्हणून मी विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्ती केली असून तसा उमेदवारी अर्ज देखील मी पक्षाकडे सादर केला आहे.
