प्रताप महाविद्यालय हे अधिकारी निर्माण करण्याचे केंद्र… पोलीस निरीक्षक देवरे
प्रताप महाविद्यालयात आयोजित प्रश्न मंजुषास्पर्धा संपन्न
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ व ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप महाविद्यालय हे मार्गदर्शन व सुविधा देणारे केंद्र आहे, हे महाविद्यालय अधिकारी निर्माण करणारे केंद्र आहे. विद्यार्थी मेहनत करून चांगल्या पदावर जातील असे मत स्पर्धेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी मांडले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविद्यालयात देशभरातील नामांकित व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व ही स्पर्धा त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करेल.
या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक डॉ. अनिल शिंदे, योगेश मुंदडे, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, संस्थेचे सह सचिव तथा अधिसभा सदस्य डॉ.धिरज वैष्णव उपस्थित होते. आपल्या शुभेच्छापर मनोगतात प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांनी म्हटले की, यश हे महत्त्वाचे नसून यशाचे शिखर गाठणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी साने गुरुजींचा आदर्श घ्यावा, सातत्याने परिश्रम करावे. या वेळी जेष्ठ संचालक योगेश मधुसूदन मुंदडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अपयशाने खचून जाऊ नका व स्वतःला कमी लेखू नका, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,असा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. तसेच या कार्यक्रमात कल्याणी पाटील ( धुळे), प्रथमेश शेवळकर (जळगाव), जितेंद्र पाटील (धुळे ) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.
राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचा निकाल
१) प्रथम बक्षीस – प्रताप महाविद्यालय
अमळनेर
(रुपये १०,०००,ट्रॉफी,प्रमाणपत्र)
२) दुसरे बक्षीस-
आर.सी. पटेल महाविद्यालय शिरपूर
(रुपये ७०००,ट्रॉफी,प्रमाणपत्र)
३) तिसरे बक्षीस –
अभय शिक्षणशास्त्र महाविद्यालय
धुळे(रुपये ५,०००,ट्रॉफी,प्रमाणपत्र)
४) उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस –
किसान महाविद्यालय पारोळा
(रुपये २,०००,ट्रॉफी,प्रमाणपत्र)
५) उत्तेजनार्थ दुसरे बक्षीस
मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव
(रुपये १०००,ट्रॉफी,प्रमाणपत्र)
स्वातंत्र्य दिन निमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे निकाल
या वेळी 15 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण झाले.
१) पहिले बक्षीस सौरभ धनगर,
(रुपये १०००,गौरव चिन्ह,प्रमाणपत्र)
२) दुसरे बक्षीस – उमेश कुंभार,
(रुपये ७.००,गौरव चिन्ह,प्रमाणपत्र)
३) तिसरे बक्षीस – भाऊसाहेब धुमाळ
(रुपये ५००,गौरव चिन्ह,प्रमाणपत्र)
४) उत्तेजनार्थ पहिले-वैष्णवी पाटील,
(रुपये १५०,गौरव चिन्ह,प्रमाणपत्र)
५)उत्तेजनार्थ दुसरे- दानेश सोनार
(रुपये १५०,गौरव चिन्ह,प्रमाणपत्र) या विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे मिळाली.
विद्यापीठस्तरीय निंबध स्पर्धेचे बक्षीस :
दि.14 ऑगस्ट 2024 रोजी विद्यापीठ स्तरीय निबंध लेखन लेखन स्पर्धा झाली. प्रस्तुत स्पर्धेची बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
१) प्रथम बक्षीस – वैष्णवी इंगळे
२) दुसरे बक्षीस – अजय वारुळे ,
३) तिसरे बक्षीस – अश्विनी चौधरी
४) उत्तेजनार्थ बक्षीसे- तेजस्विनी कोठावदे, कोशिश सुंदराणी, जयश्री पाटील व आशिष दत्तू या विद्यार्थ्यांना एकूण १९००३ रुपयांची बक्षीसे देण्यात आली. उपरोक्त विजयी सर्व महाविद्यालयांचे अभिनंदन मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. या प्रसंगी उप प्राचार्य डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. कल्पना पाटील तसेच डॉ.धनंजय चौधरी, डॉ.नलिनी पाटील, रुसा समन्वयक डॉ. मुकेश भोळे, डॉ.आर. सी.सरवदे, डॉ. अशोक पाटील, डॉ.रवी बाळसकर, डॉ.माधव भुसनर, प्रा. विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर, प्रा.वैशाली राठोड, प्रा.वैशाली महाजन, डॉ.वंदना पाटील, प्रा.देवेंद्र तायडे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.रवींद्र मराठे, डॉ.किरण गावीत, डॉ.जितेंद्र पाटील, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.विवेक बडगुजर, डॉ.एस डी बागूल, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.योगेश पाटील, डॉ.अनिल झळके, प्रा.नितेश कोचे, प्रा.रोहन गायकवाड, प्रा.विजय साळुंखे, डॉ.विलास गावित,प्रा.पुष्पा पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा.प्रतिभा पाटील,प्रा.अवित पाटील,प्रा.जयेश साळवे,डॉ.बालाजी कांबळे, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी, डॉ.राखी घरटे, प्रा.सचिन आवटे,प्रा.चंद्रशेखर वाडे, प्रा. राहूल पाटील, प्रा.कोकणी,प्रा.पारधी मॅडम, डॉ.हर्ष नेतकर आदी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर आभार स्पर्धेच्या संयोजिका प्रा.वृषाली वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व्हायोलिन वादनाद्वारे डॉ. हर्ष अरुण नेतकर यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी सचिन आवटे , प्रा.चंद्रशेखर वाडे, दिलीप शिरसाठ, पराग पाटील, मेहूल ठाकरे, दिपक चौधरी, हिमांशू गोसावी, अतुल धनगर,अहिरे अनिकेत, अहिरे आकाश, स्नेहल शिसोदे यांच्या सह सीसीएमसी व इलेट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.