पाचोर्‍याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन

0

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार…

अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे, सभापती अशोक पाटील के.डी. पाटील यांना पुरस्कार जाहीर

पाचोरा : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा शहरात 29 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी लॉन्स या ठिकाणी पत्रकारांचे विभागीय अधिवेशन संपन्न होत असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पत्रकारांना मोफत विमा वितरण केले जाणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पत्रकारांना मोफत ट्रॅक सुट आणि घड्याळाचे वितरण देखील केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे यांची देखील उपस्थिती लाभणारा असून अधिवेशनाचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे खासदार रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून पाचोरा, भडगाव, अमळनेर, तालुक्यातील एकोणावीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.

पत्रकारांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे दरवर्षी या अधिवेशनाचे आयोजन केले जात असून या अधिवेशनाला सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जे सभासद असतील त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ओळख, आयडी सोबत आणावे व जे नवीन सदस्य फॉर्म भरणार आहे त्यांनी आपल्या दैनिक,साप्ताहिक, पाक्षिक,मासिक, वृत्तपत्राचे आयडी कार्ड आधार कार्ड व पासपोर्ट फोटो सोबत आणावेत असेही आवाहन आयोजकांनी केले आहेत सर्व पत्रकारांनी याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!