सामाजिक कार्यकर्त्याच्या संघर्षाची ठेवली जाण…
पोलीस प्रशिक्षण परेड आटोपताच राहुलचा पहिला सॅल्युट मावळेंना
अमळनेर : येथील तरुण जळगाव जिल्हा पोलीस भरतीत काही गुणांनी भरती होण्यापासून वंचित राहिला होता. त्याची परिस्थिती हलाखीची होती. आई, भाऊ, यांनी काम घरून परिवार चालवला… तर त्यालाही काधिधी काम करून अभ्यास करावा लागत असे, अशा हलाखीच्या परिस्थितीत त्याने भारतीय सैन्याची नौकरी मिळवली, मात्र परिवार व आईच्या मायेने त्याला सैन्यात जाऊ दिले नाही. म्हणून त्याने जळगाव पोलीस भरतीसाठी अर्ज केला. मात्र त्यातही अवघ्या काही गुणांनी तो राहिला, त्याला समजले की, यात काही तरी गैरकृत्य आहे. आणि तो अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांच्याकडे गेला. मावळे यांनीही या प्रकरणात अभ्यास करून व अनेक मोठ्या शक्तींशी संघर्ष करून कोर्टातून ऑर्डर मिळवली आणि राहुल जळगाव पोलिसात भरती झाला. आणि त्याने त्याची जाणीव ठेवत, पासिंग परेड आटोपताच पन्नालाल मावळे यांना पहिला सॅल्युट मारला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात राहणाऱ्या राहुल चौहान नामक तरुणाने जळगाव पोलीस भरतीत उत्तम गुण मिळवले होते, मात्र त्याच्या पुढील एका उमेदवाराची निवड झाली होती. राहुल काही गुणांनी भरती हिन्यापासून वंचित राहिला. मात्र त्याने अनेक प्रयत्न केले पण कुठंच काही झालं नाही. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांची व राहुलच्या मोठ्या भावाची भेट झाली. सगळी हकीगत त्यांनी मावळे यांना सांगितली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, निवड झालेल्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र नकली आहे. आणि तेव्हा पासुन हा संघर्ष सुरू झाला. अनेक दिवस हा संघर्ष चालला, अनेक मोठ्या शक्तींनी मावळेंना व चौहान परिवाराला नमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोठल्याही आमिषाला बळी न पडता हायकोर्टात याचिका दाखल केली व त्याठिकाणी सिद्ध झाले की, त्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र नकली आहे. व कोर्टाने जळगाव पोलिसांना आदेश दिला की, निवड झालेल्या तरुणाला अपात्र करून राहुल चौहान याला सेवेत घ्यावे. तेव्हा या सगळ्यांचा संघर्ष जिंकला. आणि जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राहुलला सेवेत घेतले. त्याचे नुकतेच पोलीस प्रशिक्षण आटोपले व काल पासिंग परेड झाली. जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या या पासिंग परेड नंतर राहुल चौहानने सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांनी त्याच्या पोलीस होण्यासाठी केलेल्या संघर्षाची जाण ठेवत सॅल्युट दिला…