शिक्षक भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण….
बेरोजगार शिक्षक उमेदवारांचे 9 दिवसांपासून सुरू आहे उपोषण
पुणे प्रतिनिधी : शासनाने शिक्षक भरती बाबत वेळोवेळी आश्वासन दिली. 50 हजार शिक्षक भरती दोन टप्प्यात अशी शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांनी घोषणा केली. परंतु आपल्या घोषणेप्रमाणे शासनाला शिक्षक भरती करायला वेळ नाही. दुसऱ्या बाजूला योजनांचा पाऊस पडत असताना शाळांना शिक्षक नाहीत आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नाहीत. आपल्यावरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील पात्रता सिद्ध केलेले बेरोजगार शिक्षक युवक – युवती, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे या ठिकाणी दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पासून शिक्षक भरती फेज – २ ची कार्यवाही तात्काळ सुरु होण्यासाठी पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. गोरगरीब- गरजू, बेरोजगार शिक्षक तरुणांना शासनाच्या आश्वासनानुसार शिक्षक पदाच्या नोकऱ्या मिळाव्यात, तसेच शाळेला आणि विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळावेत यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बेरोजगार शिक्षक उमेदवारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु गेल्या ९ दिवसापासून सुरू असून. ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता महिला, युवक मोठ्या प्रमाणावर विविध जिल्ह्यांतून या आंदोलनात सहभागी होत आहेत. गेल्या ९ दिवसात शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणूनच आता नाईलाजाने शासनाचे या बेरोजगार शिक्षक अभियोग्यता धाकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व न्यायिक मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलकांनी सोमवार दिनांक २६ ऑगस्ट, २०२४ पासून बेमुदत अन्नत्याग/ आमरण उपोषण सुरू केलें आहे. सदर उपोषणकर्त्यांच्या जीविताचा आणि भवितव्याचा विषय शासन प्रशासनाच्या सहानुभूतीपूर्वक निर्णयावर सोपवला आहे.
अन्नत्याग/ आमरण उपोषण करणारे बेरोजगार शिक्षक:-
१) तुषार देशमुख
पत्ता:- मु. पोस्ट तळणी, ता.हदगाव
जिल्हा नांदेड
Mob. No 8888319919
२) प्रीती कालिदास हत्ते,
पत्ता – मु. पो. किणी,
तालुका – अक्कलकोट,
जिल्हा- सोलापूर.
३) रोहिणी कुंडलिकराव काळे,
पत्ता :- मु. पोस्ट दाणेवाडी, ता. श्रिगोंदा,
जिल्हा- अहमदगर.
४) अनिता एकनाथ हाडावळे
पत्ता:- मु. पोस्ट, मंचर, तालुका- आंबेगाव,
जिल्हा- पुणे.
५) भगवान डोहिफोडे,
पत्ता:- मु. डोहिफोडे वाडी,
पोस्ट- सिनगाव,
ता. देउळगाव राजा,
जिल्हा- बुलढाणा
वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आंदोलन उपोषणकर्त्यांनी शासनाच्या विरोधात अगतिक होऊन अगदी नाईलाजाने बेमुदत अन्नत्याग / आमरण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू करुन त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगार अभियोग्यता धारकांच्या मागण्यांचा शासनाने अत्यंत संवेदनशिलतेने विचार करून शिक्षक भरती सुरू करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.