बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निवेदन…
पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी…
पुणे : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बदलापूर मधील घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एरणीवर आल्याने त्याच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मेहतर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष रवी परदेशी, पुणे शहर महासचिव नरेश जाधव, उपाध्यक्ष महेंद्र लालबिगे, बाबूजी बेद, विजय बेद, विशाल चव्हाण, अजय वाघेला, शैलेंद्र लालबिगे, अक्षय चव्हाण, आदि यावेळी उपस्थित होते.