बदलापूर घटने मधील आरोपीला त्वरित फाशी शिक्षा द्या
अमळनेर शिवसेना उबाठा गटाने निवेदनाद्वारे केली मागणी
अमळनेर : येथील शिवसेना उभाठा पक्षातर्फे बदलापूर येथील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शिंदेला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, याबाबत अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थीवर त्याच शाळेतील कर्मचारीने बलात्कार केल्याची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली . आघाडीसह युती मधील नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागनी केली आहे .तर सत्ताधारी पक्ष हा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपी विरोधी पक्षनेते करीत आहेत. याउलट सत्ताधारी यांनी विरोधी पक्ष या घटनेचा राजकीय दृष्टीने आरोप करीत असल्याचा आरोप करीत आहेत. मात्र घटनेची सत्यता पडताळून त्वरित गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याने काही तरी राजकारण घडल्याचे बोलले जात आहे. सदर शाळा ही भाजपा पक्षाशी निगडित संचालकांची असल्याने पाहिजे तसा तपासाला वेग मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करीत आहेत. याउलट सरकारने या घटनेचा निकाल निष्पक्ष लागावा म्हणून वरिष्ठ विधी तज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. ऍड उज्वल निकम हे भाजपाचेच उमेदवार असल्याचा ही आरोप केला जात आहे. त्यामुळे तपासावर शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे घटनेमधील बलात्कारी नराधमाने क्रूर कृत्ये केल्याने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन गुरुवारी अमळनेर शिवसेना उबाठा पक्षा तर्फे कार्यकर्त्यांनी बदलापूर येथे झालेला प्रकारा बाबत न्यायालयात जलद गतीने खटला चालवण्यात यावा व त्या नरधमास फाशीची शिक्षा द्यावी. जेणे करुन अश्या
प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडणार नाहीत. मात्र सदर व्यक्तीला शिक्षा न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षातर्फे पुढे मोठे आंदोलन करण्यात येईल याची पूर्णतः जबाबदारी शासनाची असेल याची कृपया नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुकाप्रमुख…, शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, विजय काशिनाथ पाटील, बाळासाहेब नितीन निळे, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक दादा पवार, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र मराठे, तुळशीराम कोळी, गोरख पाटील, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील, रवी पाटील, हिरालाल भिल, नितीन पाटील, मोहन भोई, उमेश अंधारे आदी उपस्थित होते