मंत्री चंद्रकांत पाटील आज अमळनेरात

0

विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होऊन राजकीय आढावा देखील घेण्याची शक्यता…

अमळनेर : मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आज अमळनेर शहरात येणार असून त्यांच्या हस्ते प्रताप महाविद्यालय व लोकमान्य विद्यालयातील काही विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन होणार आहे. त्यानंतर पाटील राजकिय आढावा देखील घेण्याची शक्यता आहे.

सकाळी 10:30 वाजता प्रताप महाविद्यालयातील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन व नवीन सुसज्ज असे डिजिटल स्टुडिओचे देखील उदघाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता लोकमान्य विद्यालयातील संगणक कक्षाचे देखील उदघाटन होणार आहे. तर हे सर्व विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन संपन्न झाल्यानंतर राजकिय आढावा देखील घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!