३० हजाराची लाच घेतांना पोलीस हवालदार व पंटर एसीबीच्या जाळ्यात

0

धुळे एसीबीची कारवाई

अमळनेर : पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला 30 हजार रुपये लाच घेताना आज अटक करण्यात आली आहे. घनशाम पवार असे पोलीस हवालदाराचे नाव आहे.

घनश्याम पवारने तक्रारदारकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण याच्या हस्ते स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द अमळनेर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार याचा अमळनेर परिसरात बांधकाम मटेरियल वाहतुकीचा व्यवसाय असुन त्याच्या मालकीच्या डंपरने बांधकाम मटेरियल वाहतुक करीत असतांना अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घनशाम अशोक पवार यांनी दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी डंपर अडवुन तकारदारास तेथे बोलावुन त्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्याकरीता व स्वतः करीता दरमहा हप्ता म्हणुन ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीवर माहिती दिली होती.

सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमळनेर येथे येवुन तकारदार यांची तकार घेतली होती. सदर तक्रारीची दिनांक ९ जानेवारी रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस हवालदार घनशाम अशोक पवार यांनी तक्रारदार यांचेकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी सदर लाचेची रक्कम पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण याच्या हस्ते स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!