प्रताप महाविद्यालय व फॉर्मसी महाविद्यायाचे स्नेहसंमेलन दि.१२,१३,१४ जानेवारी रोजी होणार…
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.१२,१३,१४ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि.१२ रोजी सकाळी ०९:०० वाजता आनंद मेळवा उद्घाटन झाल्यानंतर मंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार उन्मेश पाटील याच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेशजी पांडे (सदस्य सल्लागार समिती,राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य, पूणे) प्रमुख अतिथी राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल नथ्यू शिंदे राहतील
त्यानंतर आनंद मेळावा व रेकॉर्ड भेट , क्रीडा विभाग व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारीतोषक वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच फाईन आर्ट गॅलरी व स्पोर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांचे ललित कला आविष्काराचे प्रदर्शन होईल. दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग-१ विद्यार्थी सादर करतील तसेच संध्याकाळी ०५:३० वाजता युवारंग युवक महोत्सव – २०२३ पुरस्कार प्राप्त कार्यक्रम कॉलेजचे विद्यार्थी सादर करतील.
दि.१३ रोजी सकाळी १०:०० वाजता काव्यवाचन, फॅन्सी ड्रेस, नाटिका व एकपात्री प्रयोग होणार आहे. दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग-२ होईल. संध्याकाळी ०५:३० वाजता युवारंग युवक महोत्सव – २०२३ पुरस्कार प्राप्त कार्यक्रम होईल.
दि.१४ रोजी क्रीडा,स्नेहसंमेलन व इतर विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल. यावेळी अँड उज्वलजी निकम प्रमुख अतिथी असतील. अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल राहतील.
स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह संमेलन प्रमुख प्रा.पराग पाटील व प्रा.दिनेश भलकार, यांच्यासह सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व समित्यांचे प्रमुख, समिती सदस्य प्राध्यापक बंधु-भगिनी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.