म्हातारपणी जुडली प्रीत
वयाच्या ८४ व ५९ वर्षीय दोघांचे लग्न…
अमळनेर : तालुक्यात दोघांची म्हातारपणी प्रित जुडली असून वयाच्या ८४ वर्षात एका विधुराने ५९ वर्षीय विधवेशी विवाह केला. माणसाचे वय म्हातारे होते. मन मात्र अखेरपर्यंत तरुण राहते. त्याचाच खान्देशातील अमळनेर येथे आला आहे. उतारवयात नात्र खेळवयाची हौस पुर्ण करण्याची इच्छा असतानाही लग्न करावे लागले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आपल्या सोबतीला कुणीतरी हक्काचे असावे. यासाठी
अमळनेर येथील ८४ वर्षीय विधूराने नाशिक येथील ५९ वर्षीय विधवेशी सोमवारी सायंकाळी अमळनेरच्या ज्ञानेश्वर कॉलनीत हिंदू विवाह पद्धतीने, रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. या वधुवराच्या जीवनात पुन्हा वसंत बहार फुलण्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर तरळत होता.
आत्माराम काशिराम पाटील (८४) हे मध्यप्रदेशात पोलीस निरीक्षकपदी सेवारत होते. ते सेवानिवृत्त आहेत. ते कविदेखील आहेत. आत्माराम पाटील यांची पहिली पत्नी लिलाबाई आत्माराम पाटील यांचे दि.२४ मार्च २० रोजी येथील पैलाड भागात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना एकच मुलगी आहे. तिचा विवाह झालेला आहे. इकडे अमळनेरला बाबा एकटेच राहत होते. ते हळव्या मनाचे आहेत. त्यांच्याकडे पेन्शन रुपी ठोस उत्पन्नाचा स्रोत आहे परंतु त्यांची सदोदीत देखभाल केली जात नव्हती. अखेर त्यांनी उतार वयाचा जीवन साथीचा शोध सुरु केला. त्यांना नाशिकची गेले ८ वर्षांपासून विधवा झालेली महिला मंगलाबाई नारायण जाधव (पाटील) ह्या भेटल्या. त्यांना १ मुलगा, मुलगी आहे. ते सुद्धा विवाहीत आहेत. दोनहीकडून या विवाहाला संमती मिळाल्यावर दि.१५ एप्रिल २४ रोजी ही जोडी राजीखुशीने विवाह बंधनात अडकली.
या छोट्याखानी विवाह सोहळ्याला दिपक प्रकाश जोशी तसेच त्या ताईंची विवाहीत कन्या, येथील पैलाड भागातील साहेबराव शेनपडू पाटील तसेच ज्ञानेश्वर नवल पाटील, ऍड.आर.ए.उपासनी, ऍड. आर.टी.सोनवणे, ऍड. अभिजीत बिऱ्हाडे, ऍड. रमेश देशपांडे आदि उपस्थित होते.
यावेळी एफ. एम. वर मात्र हे गीत ऐकायला येत होते.. पतझड, सावन बसंत, बहार, इक बरस के मौसम चार, मौसम चार पांचवा मौसम प्यार का …. पेढ्यांनी गोड तोंड करत उपस्थित सगळे तेथून मार्गस्थ झाले.
या विवाह सोहळ्याने अमळनेर शहरातच नव्हे तर पुर्ण राज्यभर आगळा वेगळा संदेश दिला असून. या विवाह सोहळ्याने सर्वत्र कौतुक होत असून यात पिता व आई यांच्या दोघांच्या मुलांनी घेतलेल्या निर्णयाचे देखील स्वागत होत आहे.