माजी आमदार निर्बुद्ध मंत्री अनिल पाटील संतापले….

0

पाडळसेच काम प्रगतीपथावर असून माजी आमदार जनतेची दिशाभूल करीत आहेत !

पाडळसे धरण पाहणी दौऱ्यात अनिल पाटलांची माजी आमदारांवर जोरदार बॅटिंग

अमळनेर: गेल्या १४ वर्षात निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या सुप्रमासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. तसेच २०१२ ते २०२० पर्यंत नदी पात्रात कोणालाही काम करायला परवानगी नव्हती. सर्वात मोठी अडचण अशी होती की, धरण पूर्ण करण्याची तरतूद होती पण पाणी उपसा कसा करायचा याची तरतूदच नव्हती, असा गौप्यस्फोट मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाडळसरे येथे धरणाची पाहणी करताना केला. यावेळी त्यांनी माजी आमदारांवर नाव न घेता निर्बुद्ध असल्याची सडकून टीका केली.
मंत्री अनिल पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी पाडळसरे येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, धरणाच्या १५ प्रस्तंभाची उंची सहा मीटरने वाढली आहे. उर्वरित ८ प्रस्तंभांचे काम चालू आहे. १०० फूट उंचीपर्यंत काम होऊन त्यांनतर गेट बसवण्याची प्रक्रिया होईल. या कामाची मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली. ते पुढे म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यातील बुराई उपसा सिंचन योजनेला महिनाभरात मंजुरी मिळवेल. २००६ साली एक महात्म्याने टिपणी मारून ठेवली होती की, महापूर आला की धरणाचे गेट बंद असले तर ते वाहून जातील म्हणून संकल्प चित्र बदलवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र महापूर पावसाळ्यात येतो तेव्हा धरणाचे गेट उघडे असतात तर मग गेट कसे वाहतील असा सवाल करून त्याची टिप्पणी चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. एसएफसीची मान्यता घ्यावी लागेल. येणाऱ्या अर्थसंकल्पात १५० कोटीपर्यंत निधी मिळू शकतो. शेतापर्यंत पाणी कसे न्यायचे याचा सर्वे सुरू झाला आहे. जनतेने नुसते कागद हलवणाऱ्या व नौटंकी करणाऱ्याच्या मागे जावू नये. जो लोकप्रतिनिधी इमानदार असेल त्याच्या मागे रहावे. तसेच ज्यांना सुप्रमाचे महत्व माहित नाहीत असे निर्बुध्द माजी आमदार अमळनेरकरांनी मागील काळात निवडून दिले आहेत, अशी टीका नाव न घेता मंत्री अनिल पाटील यांनी केली.
यावेळी तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील म्हणाले की, मोठा प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. १४ वर्षानंतर चौथी सुप्रमा मिळाली. शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय झाला आहे. अनिल पाटलांनी २०१९ पूर्वीच्या चुका आणि बारकाव्यांचा अभ्यास केला. वन विभाग, पर्यावरण, संकल्पचित्र आदी मान्यता बाकी होत्या. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचा खर्चाचा समावेश प्रकल्पात नव्हता. तापीची डावी बाजू अवर्षण प्रवणग्रस्त आहे. या बाबींचा समावेश नवीन सुप्रमात करण्यात आला. १ लाख एकर पेक्षा जास्त जमिनीला फायदा होणार आहे. साडेचारशे कोटी २०१९ पर्यंत खर्च झाले. आज साडे सातशे कोटी खर्च झाले आहे. धरणाचे पूर्ण काम २०२५ ला पूर्ण होईल. पातळीपासून १०० फूट उंच प्रस्तंभ होतील. ९२ किमी बॅक वॉटर, बोरी नदीत २० किमी, नद्या नाल्यात २०० किमी पाणी साचणार आहे. जनआंदोलन समिती प्रमुख सुभाष चौधरी म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी अडथळे आणले, अजित पवारांना सांगा की, तुम्ही २०१५ पर्यंत धरण पूर्ण करणार होते. तर भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील धरण महायुतीच्या काळातच होईल. केंद्राच्या माध्यमातूनच धरण पूर्ण होईल. यावेळी प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी सूत्रसंचालन विनोद कदम तर आभार महेंद्र बोरसे यांनी मानले.
यावेळी सात्री ग्रामस्थांतर्फे गावाला ७५ वर्षांनंतर रस्ता मंजूर केल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समिती सभापती अशोक पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, प्रा सुरेश पाटील, सरपंच शुभांगी पाटील, अनिल शिसोदे,मंगळग्रह संस्थांचे उपाध्यक्ष एस एन पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, माजी जि.प. सदस्य ऍड व्ही. आर. पाटील, बाजार समिती संचालक समाधान धनगर, भाईदास भिल, नरेंद्र संदानशीव, प्रताप शिंपी, गिरीश पाटील, राजेश पाटील, डॉ अशोक पाटील, मुख्तार पाटील, सुरेश पाटील, एल टी पाटील,महेंद्र पाटील, शिवाजीराव पाटील,गौरव पाटील, सात्रीचे पोलीस पाटील विनोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!