प्रा. कृष्णा रोहिदास संदानशिव यांना पीएच.डी. पदवी

0

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

 

अमळनेर  : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्रा. कृष्णा रोहिदास संदानशिव यांनी इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे.

प्रा. कृष्णा संदानशिव यांच्या संशोधनाचा विषय “A Comparative Study of the Use of Magical Realism in Select Novels of Ben Okri and Salman Rushdie” असा होता. या संशोधनामध्ये त्यांनी जागतिक कीर्तीचे साहित्यिक बेन ओकरी आणि सलमान रश्दी यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील जादुई वास्तववाद (Magical Realism) या साहित्यप्रवाहाचा सखोल व तुलनात्मक अभ्यास केला आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ. ज्योती राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करून प्रा. संदानशिव यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
प्रा. कृष्णा संदानशिव हे फैजपूर येथील निवृत्त प्राध्यापक बी. ए. संदानशिव यांचे पुतणे असून सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील इंग्रजी विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, सहकारी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!